येवला : सायगाव केंद्रातील जिल्हा परिषदची पांजरवाडी प्राथमिक शाळेला चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीकडून ३२ इंची एलईडी व लोकसहभाग आणि शिक्षकांकडून दोन एलईडी मिळाल्याने शाळेतील तीन वर्ग खोल्या डिजिटल झाल्या आहेत.या डिजिटल वर्गांचे उद्घाटन सरपंच जन्याबाई गायकवाड व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अंबादास देवरे, मुक्ताबाई घोडेराव, केंद्रप्रमुख म.का. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख चव्हाण यांनी उपस्थितांना डिजिटल वर्गाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास मोरे, सदस्य कारभारी घोडेराव, भाऊलाल देवरे, अंबादास देवरे, नारायण वाघ, ज्ञानेश्वर घोडेराव, छबू मोरे, राहुल देवरे केंद्रातील मुख्याध्यापक विजय परदेशी, देवीदास जानराव, अरुण पाटील, दत्ता पवार, समाधान अहिरे, संदीप पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते. डिजिटल शाळेसाठी केंद्रप्रमुख म. का. चव्हाण यांनी गणित व हिंदी विषयाच्या शैक्षणिक सीडीज भेट दिल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक जयश्री आग्रे यांनी केले. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रामेश्वरी क्षीरसागर यांनी आभार मानले.
सायगाव केंद्रातील जिल्हा परिषदची पांजरवाडी शाळा झाली डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:56 PM