शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत दररोज १ कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार : ICMR

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 9:56 PM

देशात सध्या दर महिन्याला ८.५ कोटी लसींच्या डोसचं उत्पादन. डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशवासींचं लसीकरण होण्याची अपेक्षा, केंद्रानं यापूर्वी दिली होती माहिती.

ठळक मुद्देदेशात सध्या दर महिन्याला ८.५ कोटी लसींच्या डोसचं उत्पादन. डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशवासींचं लसीकरण होण्याची अपेक्षा, केंद्रानं यापूर्वी दिली होती माहिती.

देशात कोरोनाच्या महासाथीमुळे हाहाकार माजला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील देशात दररोज १ कोटी लसींचे डोस (Coronavirus Vaccine) उपलब्ध होतील असं मत इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्चचे (ICMR) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं. भार्गव यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं जेव्हा सरकार लसीकरणाचं आपलं ध्येय दुप्पट करण्याच्या विचारात आहे. या वर्षाच्या अखेरिस १०८ कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. सध्या देशात असलेल्या कंपन्यादेखील उत्पादन वाढवत आहेत. तर दुसरीकडे अनेक परदेशी कंपन्यादेखील आता यामध्ये उतरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात लसींची कमतरता जाणवणार नाही असं भार्गव म्हणाले.

"चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे आणि कंन्टेन्मेंट झोनवर कठोर निर्बंध आणल्यामुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता आलं आहे. परंतु हा स्थायी उपाय मानणं योग्य नाही. लसींची कोणतीही कमतरता नाही. जेव्हा तुम्हाला केवळ एका महिन्याभरात लसीकरण करून घ्यायचं असेल तेव्हाच तुम्हाला त्याची कमतरता जाणवेल. आपली लोकसंख्या अमेरिकेच्या तुलनेत चारपट आहे. अशा परिस्थितीत आपल्याला धैर्य बाळगायला हवं," असंही डॉ. भार्गव म्हणाले. "डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. केंद्रानं सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला ही बाब सांगितली आहे," असंही ते म्हणाले. देशात सध्या दर महिन्याला ८.५ कोटी लसींच्या डोसचं (२८.३३ लाख डोस रोज) उत्पादन होत असल्याची माहिती गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं केरळ उच्च न्यायालयाला दिली. तसंच जुलै महिन्यापासून हे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. सध्या देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसी उपलब्ध आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतGovernmentसरकार