शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

1 जानेवारीपासून Cheque पेमेंटचा नियम बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 4:48 PM

Cheque Payment : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. अनेकजण विविध कामांसाठी चेक पेमेंट करत असतात.

नवी दिल्ली - कॅशलेस व्यवहारांसाठी चेक पेमेंटचा वापर केला जातो. अनेकजण विविध कामांसाठी चेक पेमेंट करत असतात. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टममध्ये काही बदल होणार आहेत. चेक पेमेंट (Cheque Payment) करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यानुसार, लोकांना 50 हजार रुपयांहून अधिकच्या रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं असणार आहे. चेक पेमेंटमध्ये होणारे फ्रॉड रोखण्यासाठी बँकेने हे पाऊल उचललं आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने  दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू होणार आहे. या सिस्टममध्ये 50 हजारांहून अधिकच्या पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावं लागेल. या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल. याच्या माध्यमातून चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील.

पॉझिटिव्ह पे सिस्टमबाबत जागरुकता निर्माण करण्याचा सल्ला

बँकेत देण्यात आलेले हे सर्व डिटेल्स पुन्हा एकदा चेक केले जातील. यादरम्यान सीटीएसमध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती आढळल्यास, बँक याबाबतची माहिती देईल आणि त्यात सुधारणा केल्या जातील. बँकांना आपल्या खातेधारकांना एसएमएस अलर्ट, बँक शाखांमधून, एटीएम, वेबसाईट आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पे सिस्टमबाबत जागरुकता निर्माण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

RBI चा मोठा निर्णय, आता 24 तास उपलब्ध असणार बँकांची 'ही' सुविधा

जर तुम्ही डिजिटल व्यवहार करत असल्यास तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा 24 तास म्हणजेच प्रत्येकवेळी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, 14 डिसेंबरपासून आरटीजीएसची सुविधा 24 तास उपलब्ध असेल. याचा अर्थ असा की तुम्ही आरटीजीएसद्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. यामुळे भारत या देशांमध्ये सामील होईल, जेथे ही सुविधा दिवसरात्र कार्यरत आहे. कोरोना काळात ऑनलाइन ट्रान्जक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आरबीआयने आरटीजीएस सुविधा 24 * 7 तास देण्याचे निश्चित केले.

भारतीय वित्तीय बाजाराच्या जागतिक एकीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आरबीआयने आरटीजीएसची वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला होता, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरटीजीएस डिजिटल फंड ट्रान्सफर करण्याची एक पद्धत आहे. आरटीजीएसच्या मदतीने कमी वेळात पैसे ट्रान्सफर केले जातात. आरटीजीएसचा वापर मुख्यतः मोठ्या प्रमाणात ट्रान्सफरसाठी केला जातो. याअंतर्गत किमान 2 लाख रुपये पाठविले जाऊ शकतात. जास्तीत जास्त रक्कम पाठविण्याची मर्यादा 10 लाख रुपये आहे. आरटीजीएसमार्फत 2 लाख ते 5 लाखांपर्यंत निधी ट्रान्सफर करण्यासाठी आरबीआयने जास्तीत जास्त 24.5 रुपये शुल्क ठेवले आहे आणि 5 लाखाहून अधिक निधी ट्रान्सफर करण्यासाठी बँक जास्तीत जास्त 49.5 रुपये शुल्क आकारू शकते. यावर जीएसटीदेखील भरावा लागतो. दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आरटीजीएससाठी कोणतेही शुल्क घेत नाही.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक