सुरेश भटेवरानवी दिल्ली : भारतात प्रतिवर्षी नव्या ट्रेन्सची संख्या वाढते आहे तरीही एप्रिल २0१६ च्या स्थितीनुसार लोको पायलट, सहायक लोको पायलट, गार्ड, गँगमन, पॉइंट मन, स्टेशन मास्तर अशा प्रवर्गातील एकुण १ लाख २२ हजार ७८३ पदे रिक्त आहेत. परिणामी कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा भार, प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, रेल्वेच्या अपघातांबाबत सतर्कता इत्यादी विषयांबाबत चिंता करावी अशी स्थिती आहे. रेल्वे संसदीय स्थायी समितीचा जो अहवाल संसदेत सादर झाला, त्यात या गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.भारतीय रेल्वेत जवळपास सव्वा लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे बºयाच कर्मचाºयांना सलग २0 तास काम करावे लागते. कामाचा वाढलेला भार, थकवा, तणाव इत्यादींमुळे रेल्वे वाहतुकीत उच्चस्तराची दक्षता ठेवणे अनेकदा अशक्य होते. रेल्वे अपघातांना निमंत्रण देणारीच ही स्थिती असल्याने रेल्वे प्रवाशांची सुरक्षा संकटात आहे. एप्रिल २0१६ च्या आकडेवारीनुसार रेल्वेची एकुण मंजूर पदे ७ लाख ४६ हजार ६७६ आहेत. प्रत्यक्षात या पदांवर फक्त ६ लाख २३ हजार ९१३ लोक काम करीत आहेत. याचा अर्थ भारतीय रेल्वेत १ लाख २२ हजार ७८३ पदे रिक्त आहेत, निश्चितच ही बाब चिंताजनक व गंभीर स्वरूपाची आहे, असे स्थायी समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.रेल्वे अधिनियम १९८९ नुसार रेल्वे कर्मचाºयांचे कामाचे तास १0 पेक्षा अधिक असू नयेत असे नमूद आहे. लोहमार्गाचे रूळ इत्यादींमधे अनेकदा तूटफूट संभवते. त्यांच्या त्वरित दुरूस्तीत गँगमनची भूमिका अत्यंत महत्वाची असते. सध्या रेल्वेकडे पुरेसे गँगमन नाहीत, ही लक्षवेधी बाब या अहवालाव्दारे प्रकाशात आली आहे. ट्रेन प्रवासाचे सुरक्षित व सतर्क संचालन एक अवघड जबाबदारी आहे. लोको पायलट ती सांभाळतात. प्रवासाच्या प्रत्येक किलोमीटरवर सिग्नल यंत्रणेवर त्यांना लक्ष ठेवावे लागते. १00 कि.मी.अंतराच्या प्रवासात १00 वेळा बाहेर डोकवावे लागते. पुरेसे लोको पायलट नसल्याने बºयाच लोको पायलटना सलग ४ ते ५ दिवस काम करावे लागते. त्यांच्याकडून जराशी देखी चूक झाली तर अनेक प्रवाशांचे आयुष्य संकटात सापडू शकते. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या स्थायी समितीने रेल्वे भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ट्रेन्सच्या वाढत्या संख्येनुसार काही प्रमाणात रेल्वेत नवी भरती झाली मात्र ती पुरेशी नाही. गेल्या ४ वर्षांपासून रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही झालेली नाही, असे नमूद करीत आगामी वर्षात रेल्वेच्या सेवेतून किती कर्मचारी निवृत्त होणार आहेत, याचे निर्दोष आकलन करून रेल्वेची नोकर भरती व्हायला हवी, अशी सूचना स्थायी समितीने केली आहे.
ट्रेन्सची संख्या वाढते आहे तरीही रेल्वेत १ लाख २२ हजार पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 8:39 PM