झारखंडच्या देवघर येथील सिव्हील सर्जन कार्यालय परिसरात कोरोना व्हॅक्सीनला नष्ट करण्यात आलं. तब्बल १ लाख ९५ हजार व्हॅक्सीन, ज्या एक्पायर झाल्या होत्या, त्यांना शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्यात आलंय. या व्हॅक्सीन सर्वप्रथम उकळल्या पाण्यात टाकण्यात आल्या. त्यानंतर जमिनीत पुरण्यात आल्या. कोरोना काळात कोरोनाची लस घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, आत्ता या लस नष्ट करण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या काळात कोरोनाची लस टोचण्यासाठी पहाटेपासून रांग लागत होते. लस घेण्यासाठी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत, नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सर्वचजण आग्रही होते. स्वत: लस टोचून घेत इतरांनाही लस टोचून घेण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, आजमित्तीला या कोरोना लस नष्ट करण्यात येत आहेत.
देवघर येथील सदर रुग्णालयातील डॉ. अलोक सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक्सपायर झालेल्या कोरोना लस या वेगवेगळ्या तारखेच्या आहेत. या सर्व लसींना आज नष्ट करण्यात आलं. दरम्यान, या लस नष्ट करताना एससीएमओ डॉ. सीके शाही, डीपीएम निरज भगत, रिजलन लसीकरण केंद्र प्रभारी संजय कुमार व संजिव कुमार हेही हजर होते.