नवी दिल्ली : निरर्थक याचिका दाखल करण्याच्या विरोधात कठोर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याविरुद्धची याचिका फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
राहुल गांधींंना ‘मोदी’ आडनावावरील टिप्पणीबाबतच्या मानहानी खटल्यात ठोठावलेल्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली होती. तीन दिवसांनी लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व बहाल करणारी अधिसूचना जारी केली. लखनौच्या अशोक पांडे यांनी अधिसूचनेला कोर्टात आव्हान दिले होते.