शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

१० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त जि.प.चे स्वच्छता अभियान : परिश्रम घेणारे पदाधिकारी, ग्रामस्थांचा सत्कार

By admin | Published: October 13, 2015 8:50 PM

जळगाव- हगणदरीमुक्त ग्रापंचायत संकल्पनेतून जिल्हाभरातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाची जोड आणि पंतप्रधानांचे स्वच्छतेचे आवाहन यास प्रतिसाद देत या कार्यक्रमास गती मिळाली आहे.

जळगाव- हगणदरीमुक्त ग्रापंचायत संकल्पनेतून जिल्हाभरातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाची जोड आणि पंतप्रधानांचे स्वच्छतेचे आवाहन यास प्रतिसाद देत या कार्यक्रमास गती मिळाली आहे. जिल्हाभरात २ ऑक्टोबरपासून स्वच्छतेसंबंधीचा कार्यक्रम राबवित येत आहे. निर्मलग्राम योजनेचे नाव बदलण्यात आले असून, स्वच्छ भारत मिशन हाती घेण्यात आले आहे. त्यातच हगणदरीमुक्त ग्रामपंचायत ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्या गावात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शौचालये आहेत अशा गावांमध्ये १०० टक्के शौचालये तयार करून हगणदरीमुक्त गाव संकल्पनेला आकार दिला जात आह. पूर्वी प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय निर्मिती करून निर्मल ग्राम संकल्पना राबविण्यात येत होती. २०१३ मध्ये निर्मलग्राम योजनेऐवजी स्वच्छ भारत मिशन हाती घेण्यात आले. त्यात मागील वर्षी हगणदरीमुक्त ग्रामपंचायत ही संकल्पना हाती घेण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी दिली. जिल्हाभरात हगणदरीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत २०१५-१६ मध्ये अमळनेर तालुक्यातील आमोदे व सुंदरप˜ी, भुसावळमधील शिंदी, चाळीसगाव तालुक्यातील डामरून, खरजई व राहिपुरी, चोपडा तालुक्यातील करजाने, एरंडोलमधील आनंदनगर, यावल तालुक्यातील नावरे आणि मुक्ताईनगर तालुक्यातील वायले ही गावे हगणदरीमुक्त झाली आहेत. महात्मा गांधींना वंदन करून अभियानहगणदरीमुक्त गावांमध्ये २ ऑक्टोबरपासून विविध उत्सव, कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यात २ रोजी संबंधित गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. त्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गावात अधिकार्‍यांच्याहस्ते हगदणरीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेसाठी योगदान देणार्‍या काही ग्रामस्थांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. जिल्हाभरात ११५१ ग्रा.पं. आहेत. पैकी १२० ग्रा.पं. निर्मलग्राम योजनेत यशस्वी झाल्या आहेत. आता हगणदरीमुक्त गाव संकल्पनेत जे गाव कमी वेळेत हगणदरीमुक्त करणे शक्य आहे त्या गावावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात संबंधित गावांमध्ये २५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गटविकास अधिकारी व इतर अधिकारी आवर्जून त्या कार्यक्रमास प्रातिनिधीक स्वरुपात निवडलेल्या गावात उपस्थित होते. हगणदरीमुक्त गावांची तालुकानिहाय संख्या- अमळनेर- २, भुसावळ- १, चाळीसगाव- ३, चोपडा- १, एरंडोल- १, यावल- १, मुक्ताईनगर १.