शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे

By admin | Published: June 27, 2017 6:38 AM

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले आहेत.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 27 - डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते. सोमवारी रात्री उशीरा साधारण 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना "सच्चा दोस्त" म्हणणा-या डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फर्स्ट लेडी  मेलेनिया ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं व्हाइट हाऊसमध्ये उत्साहात स्वागत केलं. व्हाइट हाउसमध्ये प्रवेश करताना त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केलं. 

एक नजर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील महत्वाच्या मुद्द्यांवर- 

1- मोदी महान पंतप्रधान – ट्रम्प 

द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महान पंतप्रधान असा उल्लेख करत तुम्ही अमेरिकेत येणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. ट्रम्प म्हणाले, मोदी महान पंतप्रधान आहेत, माझं त्यांच्यासोबत बोलणं होत असतं, मी त्यांच्याविषयी वाचतही असतो. ते अत्यंत चांगलं काम करत आहेत, भारताची अनेक बाबतीत प्रगती होत आहे,  त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.
 
2- भारत अमेरिकाचा सच्चा दोस्त- ट्रम्प
या वर्षी भारत स्वातंत्र्यांचं 70 वं वर्ष साजरं करणार आहे, याबाबत मी भारताच्या जनतेचं अभिनंदन करतो. राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारावेळी मी भारत अमेरिकेचा खरा मित्र असल्याचं म्हटलं होतं आणि ते खरं ठरलं आहे. 
 
3- मोदी आणि मी सोशल मीडियातही लीडर- ट्रम्प
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानाचं स्वागत करणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. मोदी आणि मी सोशल मीडियातही जगाचे लीडर आहोत असं संयुक्त पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच ट्रम्प म्हणाले.  
 
4- भारत जगातील सर्वाधिक जलद वाढ होणारी अर्थव्यवस्था- ट्रम्प
भारत आणि अमेरिकेच्या संविधानात "We The People" हे तीन शब्द समान आहेत. आजच्या भेटीनंतर मी म्हणू शकतो की भारत आणि अमेरिकेमध्ये इतके चांगले संबंध कधीच नव्हते. पीएम मोदी तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. भारत जगातील सर्वाधिक जलद वाढ होणारी अर्थव्यवस्था आहे. 
 
5- एकत्र मिळून दहशतवादाचा खात्मा करणार- ट्रम्प
दोन्ही देशांना दहशतवादाच्या राक्षसाने नुकसान पोहोचवलं आहे. कट्टरपंथी विचार संपवण्यासाठी कटीबद्ध आहोत. आम्ही इस्लामिक दहशतवादाचा खात्मा करू"" असं संयुक्त निवेदनामध्ये म्हटलं आहे. 
 
6- हा 125 कोटी भारतीयांचा सन्मान- मोदी
ट्रम्प यांच्याकडून उत्साहात झालेल्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानले. माझं स्वागत म्हणजे 125 कोटी नागरिकांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले.
 
7- दोन्ही देश एकमेकांचे चांगले सहकारी - मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहात तर आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही. या परंपरेला एकत्र पुढे नेऊया. भारत-अमेरिका एकत्र येऊन जगाला काहीतरी देऊ शकतो. या दिशेने तुमचे नेतृत्व महतावाची भूमिका बजावेल. भारत अमेरिकेसाठी आणि अमेरिका भारतासाठी चांगले सहकारी आहे.
 
8- दहशतवादाविरोधात लढणं प्राथमिकता- मोदी
दहशतवादासारख्या गंभीर समस्येपासून आपल्या समाजाची रक्षा करणं ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे, असं मोदी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये दहशतवादाच्या मुद्यावर इंटेलिजन्सची माहिती देण्यावरही सहमती झाली आहे. 
 
9- दोन्ही देश विकासाचे ग्लोबल इंजिन- मोदी
पीएम मोदी म्हणाले, आमच्यात झालेली चर्चा सर्वार्थाने अत्यंत महत्वाची होती. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश म्हणजे विकासाचे ग्लोबल इंजिन आहे. 
10-  ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार, ट्रम्प यांनाही भारतात येण्याचं निमंत्रण- मोदी 
ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकतेचे नेतृत्व करण्यासाठी भारतात यावे असे आमंत्रण मोदी यांनी इवांका यांना दिले आहे. त्यांनी ते स्वीकारले असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रपतींनी सहकुटुंब भारतात येण्याचं मी त्यांना निमंत्रण देतो, त्यांचं स्वागत करण्याची मी वाट पाहत आहे, असं म्हणत मोदींनी ट्रम्प यांनाही निमंत्रण दिलं. ट्रम्प यांनी मोदींचं निमंत्रण स्वीकारलं असून अजून नेमकी तारीक नक्की झालेली नाही.