शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

१० केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्तेमध्ये घट !

By admin | Published: January 15, 2017 4:56 AM

नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा दिल्याचे सर्वांनाच आठवत असेल. आता तसेच घडत आहे. वर्षभरात पंतप्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासह १0 मंत्र्यांची

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा दिल्याचे सर्वांनाच आठवत असेल. आता तसेच घडत आहे. वर्षभरात पंतप्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासह १0 मंत्र्यांची मालमत्ता घटली आहे. पण काही महिला मंत्र्यांच्या संपत्तीत २०१५-१६ मध्ये वाढ झाली आहे. मनेका गांधी यांच्याकडे २०१४-१५ मध्ये ३८.६४ कोटी रुपयांची संपत्ती होती. २०१५-१६ मध्ये ती वाढून ४४.९९ कोटी रुपयांची झाली. त्याचप्रमाणे सुषमा स्वराज आणि त्यांचे पती स्वराज कौशल यांची २०.५० कोटी रुपयांची संपत्ती २६.१९ कोटी रुपयांपर्यंत वाढली. हरसिमरत कौर बादल यांच्याकडे २०१४-१५ मध्ये ८७.४५ कोटी रुपयांची संपत्ती होती. तथापि, त्यांनी संपत्तीचे २०१५-१६ साठीचे घोषणापत्र आतापर्यंत सादर केलेले नाही. उमा भारतींकडे २०१४-१५ मध्ये १.४९ कोटी रुपयांची संपत्ती होती. २०१५-१६ मध्ये ती १.७० कोटी रुपये झाली. स्मृती इराणी या एकमेव महिला मंत्री आहेत ज्यांच्या संपत्तीत घट झाली. त्यांच्याकडे २०१४-१५ मध्ये ७.८९ कोेटी रुपयांची संपत्ती होती. ती २०१५-१६ मध्ये ७.५० कोटी रुपयांची झाली. विवरण देणे पंतप्रधानांनी केले बंधनकारक- २७ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १५ मंत्र्यांच्या संपत्तीत २०१५-१६ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ, तर मोदी यांच्यासह १० मंत्र्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. मोदींनी मंत्र्यांना संपत्ती व देणी यांचे विवरण दरवर्षी दाखल करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार २५ मंत्र्यांनी संपत्तीचे विवरण दिले. मनोहर पर्रीकर यांनी विवरण दिलेले नाही. - संपत्तीची विवरणपत्रे ‘लोकमत’ने मिळवली. त्यानुसार महाराष्ट्राचे दोन मंत्री गरीब झाले. गडकरींकडे १४.५७ कोटींची संपत्ती होती. त्यांची संपत्ती घसरून १२.८४ कोटी रुपयांवर आली. प्रभू यांच्याकडे ५.४१ कोटी रुपयांची संपत्ती होती. तिच्यामध्ये २० लाखांची घट झाली. - जेटलीही पुन्हा गरीब झाले आहेत. २०१४-१५ मध्ये त्यांच्याकडे १३१.२१ कोटी रुपयांची संपत्ती होती. ती आता १३०.४२ कोटी झाली आहे. वकिली व्यवसाय सोडल्यापासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मोदींकडे १.८३ कोटी रुपयांची संपत्ती होती ती घटून १.७३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.मालमत्तेमधील फरक(सर्व आकडे कोटींत)मंत्री २०१४-१५१५-१६नरेंद्रसिंह तोमर १.०१ १.१९रामविलास पासवान ०.९५ १.२१हर्षवर्धन १.५४ १.६०राधामोहन सिंह२.३ ३.२१राजनाथ सिंह २.९७ ३.४२जगत प्रकाश नड्डा२.५९ ३.६३प्रकाश जावडेकर३.२३ ३.९१कलराज मिश्र५.२७ ६.१४अनंत गिते५.१४ ६.१९अशोकजी राजू ५.७७ ७.९व्यंकय्या नायडू ९.९१ १०.५०रविशंकर प्रसाद १२.१६ १४.५३जुएल ओराम २.८६ २.३६थावरचंद गेहलोत४.१२ ३.५२अनंत कुमार ४.४९ ४.४८चौधरी वीरेंद्र सिंह१५.८५ १५.५०सदानंद गौडा१६.२९ १५.८६अरुण जेटली १३१.२१ १३०.४२