शाब्बास पोरी! अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीची कमाल; तासाभरात 33 पदार्थ तयार करून केला वर्ल्ड रेकॉर्ड
By सायली शिर्के | Published: October 13, 2020 11:35 AM2020-10-13T11:35:48+5:302020-10-13T11:49:47+5:30
Sanvi M Prajit : अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने कमाल केली आहे. फक्त एका तासात तब्बल 33 पदार्थ बनवून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
नवी दिल्ली - एखादा स्वादिष्ट पदार्थ तयार करताना अनेकांच्या नाकीनऊ येतात. मात्र अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने कमाल केली आहे. फक्त एका तासात तब्बल 33 पदार्थ बनवून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. सानवी एम. प्रजिथ (Sanvi M Prajit) असं या चिमुकलीचं नाव असून तिने एका तासामध्ये सलग 33 डिश तयार केल्या आहेत. इडली, मशरूम टिक्का, पापडी चाट, वॉफल, फ्राईड राईस, चिकन रोस्ट, पॅन केक, अप्पम यासह अनेक चविष्ट पदार्थ तयार केले आहेत.
सानवीचं 'Saanvi Cloud 9' या नावाने स्वत:चं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. यावर ती प्रेक्षकांसाठी नवनवीन पदार्थांची मेजवानी घेऊन येत असते. मोठं होऊन सानवीला एक उत्कृष्ट शेफ होण्याची इच्छा आहे. फक्त एका तासात 33 पदार्थ बनवल्याने सानवीचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. तसेच खमंग, चटपटीत पदार्थ तयार करण्यासोबत तिला डान्सची देखील आवड आहे. ती केरळच्या एर्नाकुलमची रहिवासी असून तिचे वडील परजीत बाबू एअरफोर्समध्ये विंग कमांडर आहेत.
खाद्यपदार्थांमुळे सानवी खूपच लोकप्रिय
चविष्ट खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रेरणा आईकडून मिळाल्याचं सानवीने म्हटलं आहे. मंजमा असं सानवीच्या आईचं नाव असून त्या एक उत्तम शेफ आहेत. तसेच एका रिएलिटी शोच्या त्या फायलिस्ट देखील होत्या. त्यांना पाहूनच सानवीला पदार्थ तयार करण्यात आवड निर्माण झाली. ती नेहमीच आईला स्वयंपाक करताना मदत करते. सानवीने लहान मुलांसाठी असलेल्या अनेक कुकरी शोमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच आपल्या खाद्यपदार्थांमुळे ती खूपच लोकप्रिय झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कमाल! चिमुकल्याची जबरदस्त आहे शार्प मेमरी, वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!https://t.co/gHjL5w47Ef#AadithVishwanathGourishetty#WorldBookofRecord
— Lokmat (@MiLOKMAT) October 8, 2020
कौतुकास्पद! एक वर्ष 9 महिन्यांच्या 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड भारी
हैदराबादच्या एका चिमुकल्याने कमाल केली आहे. तल्लख बुद्धीमत्तेमुळे त्याची वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (World Book of Record) नोंद करण्यात आली आहे. अवघं एक वर्ष आणि नऊ महिने वय असलेल्या चिमुकल्याच्या दमदार कामगिरीने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टी (Aadith Vishwanath Gourishetty) असं मुलाचं नाव असून सर्वत्र त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. वर्ड बुक ऑफ रेकॉर्डसोबत आदिथच्या नावे अन्य ही अनेक रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे.
आदिथची शार्प मेमरी पाहून अनेक जण गेले भारावून
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि अन्य दोन राष्ट्रीय रेकॉर्ड्समध्ये आदिथच्या नावाची नोंद आहे. आदिथची शार्प मेमरी पाहून अनेक जण भारावून गेले आहे. एवढ्या लहान वयात अनेक गोष्टींचं ज्ञान कसं काय असू शकतं?, सर्व गोष्टी कशा लक्षात राहतात? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. विविध देशाचे झेंडे, कारचे लोगो, अल्फाबेट्स, देवदेवतांची नावे यासाह अनेक गोष्टी आदिथ क्षणात ओळखतो. शार्प मेमरीसाठी आदिथ लोकप्रिय झाला आहे. अवघड गोष्टींची उत्तर तो अत्यंत सहज देत असल्याने सर्वांनाचं त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आहे. तसेच त्याच्या या गुणांमुळेच वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.