चंदीगढ : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात गर्भपात करण्यास मनाई केलेल्या १० वर्षांच्या एका बलात्कारित मुलीची गुरुवारी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णायलात प्रसूती होऊन तिला कन्यारत्न झाले.Þडॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोवळ््या वयाची ही गर्भवती प्रसूती वेदना सहन करू शकणार नाही व नैसर्गिक प्रसूतीसाठी द्यावा लागणारा रेटा सोसण्याएवढे तिचे शरीर बळकट नाही, हे लक्षात घेऊन सिझेरियन शस्त्रक्रियेने ती पार पाडली गेली. बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती चांगली आहे. परंतु जन्माला आलेली मुलगी अपुºया दिवसांचीअसल्याने तिला अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.गरोदरपण आणि बाळंतपण या गोष्टी समजण्याचे मुलीचे वय नाही. किंबहुना या गोष्टींमुळे तिच्या आधीच टेकीला आलेल्या शारिरीक प्रकृतीत विकृत मानसिक ताणाची भर पडेल यादृष्टीने डॉक्टरांनी किंवा तिच्या आई-वडिलांनीही तिला बाळ झाल्याचे सांगितलेले नाही. तुझ्या पोटात दगड होता व पोट कापून तो बाहेर काढण्यात आला, असे या निरागस मुलीला सांगण्यात आले!या बालिकेवर तिच्यामामानेच केलेल्या बलात्कारामुळेनको असलेले मातृत्व लादले गेले आहे. हा बलात्कारी मामा सध्या तुरुंगात आहे. या मुलीचे कुटुंब मुळचे नेपाळचे असून ते चंदीगडमधील एका झोपडपट्टीत राहते.पोटात दुखू लागले म्हणून रुग्णालयात तपासणी केली असता ही मुलगी ३२ आठवड्यांची गरोदर असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दिल्लीतील एका वकिलाने तिच्या वतीने गर्भपात करून घेण्यासाठी याचिका केली. परंतु गर्भपाताने गरोदर महिला व पोटातील गर्भ या दोघांच्याही जिवाला धोका संभवू शकतो, असा अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांनी दिल्यानंतर न्यायालयाने गर्भपातास परवानगी नाकारली होती. (वृत्तसंस्था)>ते मूल दत्तक देणारमुलगी अज्ञान असल्याने कायद्यानुसार तिचे पालकच तिच्या वतीने निर्णय घेऊ शकतात. होणारे मूल आम्हाला नको आहे, असे पालकांनी आधीच लिहून दिले आहे. त्यामुळे बलात्कारितेस झालेली मुलगी इस्पितळातून ‘डिस्चार्ज’ देण्यालायक होईपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील.त्यानंतर तिला राज्य सरकारच्या ‘आशियाना’ या दत्तकविधान संस्थेकडे सुपूर्द केले जाईल. त्यानंतर कायद्यानुसार ही मुलगी दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असल्याची रीतसर जाहिरात देऊन इच्छुक पालकांना ती दत्तक दिली जाईल.
१० वर्षांची बलात्कारिता झाली माता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 4:39 AM