कानपूर : कानपूर शहराच्या स्वरूपनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या एका निवासी इमारतीमधून राष्ट्रीय तपासी यंत्रणा (एनआये) व उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे १०० कोटी रुपयांचा बाद नोटा जप्त केल्या. सरकारने एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, त्यानंतर त्या नोटांचे एवढे मोठे घबाड हाती लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.सिसामाभ येथील एका बिल्डरने दिलेल्या माहितीवरून मंगळवारी संध्याकाळी ही धाड टाकण्यात आली. तेव्हापासून पकडलेल्या नोटांची मोजदाद केली असता, त्या९६.२० कोटी रुपयांच्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या अर्धवट बांधलेल्या घरातून या नोटाहस्तगत करण्यात आल्या, तेआनंद खत्री यांच्या मालकीचे आहे. हे खत्री रियल इस्टेट, आरोग्यसेवा व कापड इत्यादी व्यवसाय करणाºया राजरतन उद्योगसमूहाशी संबंधित आहेत.
१०० कोटींच्या बाद नोटा जप्त; १६ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 2:55 AM