- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कृषी मंत्रालयाने नव्या सरकारसाठी १०० दिवसांचा अजेंडा तयार केला आहे. ज्या सव्वासात कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा किसान सन्मान निधी नोंदणी नसल्यामुळे मिळू शकलेला नाही, त्यांना आता आचारसंहिता संपताच नोंदणी करून उर्वरित पावणेपाच कोटी शेतकऱ्यांप्रमाणे लाभान्वित करण्यात येणार आहे.कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन १०० दिवसांच्या कामकाजाचा अजेंडा तयार केला आहे. सॉईल हेल्थ कार्ड योजनेबरोबरच इनाम योजनेवरही काम केले जात आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने शेतकºयांची बाजार समितीत नोंदणी करून पिकाची खरेदी किमान आधारभूत किमतीने करण्याचा मार्ग मोकळा होईल. याशिवाय ग्रामीण भागातील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांशी त्यांच्याच भाषेतून संवाद साधून दुप्पट लाभ देणाºया पीक योजनांचा लाभ देण्यासाठी जागरूकता कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
कृषी मंत्रालयाने तयार केला १०० दिवसांचा अजेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:10 AM