उन्नाव (उ. प्र.) : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर येथे गंगा नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांत शंभरावर मृतदेह तरंगताना आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे़ अतिशय कुजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेतील हे मृतदेह पात्राबाहेर काढण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे़ दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेश सरकारकडून याबाबत माहिती मागितली आहे़उन्नाव जिल्ह्याच्या परियार घाटाजवळ नदीपात्रातील पाणी आटल्याने रेतीत रुतून बसलेले अनेक मृतदेह आढळून आल्याने प्रशासनही हादरले आहे़ काल मंगळवारी ३० मृतदेह आढळले होते़ आज बुधवारी आणखी ५० मृतदेह आढळून आले़ अधिकृतरीत्या मृतदेहांचा आकडा ८० असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षदर्शींच्या मते हा आकडा शंभरावर असावा. जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल यांनी सांगितले, की मृतदेह अतिशय सडलेले आहेत आणि डॉक्टरांच्या मते त्यांचे शवविच्छेदन अशक्य आहे़ त्यामुळे डीएनए चाचणीसाठी डॉक्टरांचे एक पथक या मृतदेहांचे नमुने गोळा करीत आहे.
गंगेत शंभरावर मृतदेह
By admin | Published: January 15, 2015 5:39 AM