- त्रियुग नारायण तिवारीलोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : अयोध्येत बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० डिसेंबर रोजी उद्घाटन करणार आहेत. या शहरात रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान रामाच्या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्या दिवशी निमंत्रितांना घेऊन अयोध्या विमानतळावर सुमारे १०० विमाने येण्याची शक्यता आहे. त्यांच्या वाहतूक नियोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
अयोध्या शहराला आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रात खास ओळख मिळावी यासाठीही उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३० डिसेंबरच्या दौऱ्यात अयोध्येत ते अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचादेखील समावेश राहणार आहे. तसेच त्यांची त्या दिवशी जाहीर सभादेखील होणार आहे.
त्या शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या बांधकामाच्या प्रगतीचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका बैठकीत आढावा घेतला. रामपथ, भक्तिपथ, जन्मभूमी पथ, धर्मपथ तसेच अयोध्या विमानतळाच्या बायपासपासून नयाघाट भागाला जोडणाऱ्या रस्त्याचे, रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम किती पूर्ण झाले आहे, याचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
संपूर्ण अयोध्या राममयनरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा लक्षात घेऊन ते सारे शहर सुशोभित करण्याचे योगी आदित्यनाथ सरकारने ठरविले आहे. त्यासाठी विकासकामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. या दौऱ्यानंतर काही दिवसांनी भगवान रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे.त्यानिमित्त देशभरातून अनेक मान्यवर या शहरात येणार आहेत. संपूर्ण अयोध्या राममय झाल्याचे चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहावे, असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा प्रयत्न आहे.
या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळी व नंतरही अयोध्या शहर अत्यंत स्वच्छ असावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्या शहरातील नगरनिगममध्ये सध्या ३ हजार सफाई कर्मचारी आहेत. त्यांची संख्या ५ हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
अयोध्या पर्यटनाचा डिजिटल नकाशा तयार करणारnअयोध्येचा डिजिटल स्वरूपातील पर्यटन नकाशा विकसित करण्यात येणार आहे. nत्यात तेथील प्रमुख ठिकाणे व सुविधांची माहिती असेल, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३० डिसेंबर रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सभेला दीड ते दोन लाख लोक येण्याची शक्यता आहे.nया लोकांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याचे तसेच सभेला आलेल्या लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.