ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करून 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात येऊन काही महिने उलटत नाहीत तोच आता 100 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने सुरू केली आहे. मात्र 100 रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होता चलनात कायम राहणार आहेत.
ही नोट महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्य अधिसूचनेत म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेकडून लवकरच नव्या बँक नोटा जारी करण्यात येणार आहेत. या नोटा महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इनसेटलेटरमध्ये आऱ हे अक्षर लिहिलेले असेल. तर नोटांचा छपाई वर्ष 2017 असेल. त्याबरोबरच आरबीआय 50 आणि 20 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणणार आहे. मात्र त्यांच्याही जुन्या नोटा चलनात कायम राहतील.