उज्जैन: मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये असलेल्या बाबा महाकाल मंदिराच्या जिर्णोधाराच काम सध्या सुरू आहे. यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान 1,000 वर्षे जुने परमार कालीन मंदिर सापडले आहे. याशिवाय, खोदकामादरम्यान 11व्या शतकातील अनेक मूर्तीही मिळाल्या आहेत. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर परमार कालीन वास्तुकलेतील हे अतिशय सूंदर मंदीर सामान्यांनाही पाहायला मिळेल.
2100 वर्षे जुनी भिंत सापडलीजिर्णोधारासाठी 30 मे रोजी महाकाल मंदिराच्या समोरील भागात खोदकाम सुरू असताना देवीची मूर्ती आणि शिलाखंड सापडला होता. याची माहिती मिळताच भोपाळमधून पुरातत्व विभागातील एका टीमला मंदिरात निरीक्षणासाठी पाठवण्यात आले. त्या टीमला लीड करत असलेले पुरातत्व अधिकारी डॉ. रमेश यादव यांनी सांगितले होते की, मंदिराच्या उत्तर दिशेला जमिनीखाली 11 किंवा 12 व्या शतकातील मंदिर दबलेले आहे. यानंतर उत्तर दिशेला खोदकाम सुरू करण्यात आले. तिथे हे प्राचीन मंदिर सापडले.
मंदिराबाबत पूर्ण माहिती नाहीमंदिराच्या खोदकामात एकानंतर एक प्राचीन वास्तू सापडत आहेत. आतापर्यंत अनेक मूर्ती याठिकाणी सापडल्या असून, मंदिराच्या दक्षिण दिशेकडे खोदकाम केल्यानंतर 2,100 वर्षे जुनी भिंत आढळली आहे. यापूर्वीही 2020 मध्ये महाकाल मंदिरात 1,000 वर्षे जुने मंदिराचे अवशेष मिळाले होते. डॉ. रमेश यादव म्हणाले की, खोदकामात सापडलेले मंदिर कुणी बांधले, याबाबत अद्याप माहिती नाही. पण, येणाऱ्या काळात खोदकाम पूर्ण झाल्यानंतर या मंदिराची माहिती मिळू शकेल.