जळगाव: महिलांविरुध्दचे अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली १०३ क्रमांकाची हेल्पलाईन जिल्ात बंद असल्याचे उघड झाले आहे. या क्रमांकावर संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. नियंत्रण कक्षाला विचारणा केली असता त्यांच्याकडूनही या क्रमांकाबात माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, १०३ या क्रमांकाबाबत पोलिसांनाच त्याची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले.महिलांवर अत्याचार झाला असेल तर संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचा अफलातून सल्ला सीआरओ गुंजाळ यांनी दिला. महिलांच्या न्याय हक्कासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र महिला कर्मचार्यांचा कक्ष स्थापन आहे, तेथे समक्ष येऊन तक्रार दाखल करा, असेही तेथील तायडे नामक कर्मचार्याने सांगितले.निर्भयाची स्थापनामहिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या दिमतीला कॅमेरा असलेले अत्याधुनिक वाहन देण्यात आले आहे. या वाहनावर व्हॉट्स ॲप व टोल फ्री क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहे. या वाहनावर महिला व मुलींचे मनोबल वाढविणारे स्लोगन लिहिण्यात आले आहेत.नियंत्रण कक्ष व व्हॉटस् ॲप क्रमांकमहिलांनो घाबरु नका, निर्भय रहा!, जळगाव पोलीस दल आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे असे स्लोगन लिहून नियंत्रण कक्षाचा ०२५७-२२२३३३३, टोल फ्रि क्रमांक १०० व व्हॉट्स ॲप ९४२२२१०७०२ हा क्रमांक महिला व जनतसेसाठी खुला करण्यात आला आहे. हे तिन्ही क्रमांक वाहनावर टाकण्यात आले आहेत.
103 क्रमांकाची हेल्पलाईन जिल्ात बंद उदासिनता : नियंत्रण कक्षालाही नाही खबर
By admin | Published: November 19, 2015 9:59 PM