शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

१0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू

By admin | Published: April 14, 2016 6:23 PM

पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. १४ -  पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते. मात्र तिच्या पतीच्या निधनानंतर तिला ते पेन्शन मिळू लागल्याने वडिलांच्या निधनामुळे मिळणारे पेन्शन बंद करण्यात आले होते.सिरी कुमारी गौरांग या महिलेचे वडिल पहिल्या महायुद्धात ८ मार्च १९१६ रोजी मरण पावले होते. तेव्हा ती अवघ्या पाच वर्षांची होती. तिला ९ मार्चपासून १९१६ पासून पेन्शन सुरू करण्यात यावे, असा निर्णय वडिलांच्या मृत्यूनंतर झाला होता. काही वर्षांनी तिचा लष्करातील जवानाशी विवाह झाला. तो सप्टेंबर १९६४ मध्ये मरण पावला. तेव्हापासून पतीच्या निधनानंतरचेही पेन्शन सुरू झाले. तेव्हापासून २00७ पर्यंत तिला याप्रकारे दोन पेन्शनची रक्कम मिळत होती.तिला दोन पेन्शनची रक्कम मिळत असल्याचे २00७ साली पेन्शन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली. तसेच त्या कारणास्तव आधीच्या वर्षांत दिलेली पाच लाखांची रक्कम तिथे परत करावी, असा आदेश तिला पेन्शन विभागाने दिला. एवढेच नव्हे, तर नवऱ्याच्या निधनामुळे मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतून ती रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली. ही रक्कम १ लाख १७ हजार रुपये होती.पेन्शन विभागाच्या या निर्णयाला या महिलेने लवादासमोर आव्हान दिले होते. त्यात केंद्र सरकार आणि लष्कर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. तिच्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर तिला २00७ पासून थांबवलेली पेन्शनची सर्व रक्कम सुरू करावी, यापुढे ती कायम ठेवावी तसेच कापलेली रक्कम १0 टक्के व्याजाने परत करावी, असा आदेश लवादाने दिला आहे. तसेचआलेल्या खर्चापोटी केंद्र सरकार आणि लष्कर यांनी मिळून एक लाख रुपये तिला द्यावेत, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे मिळत असलेली पेन्शन सुरू झाली, तेव्हा ती आयुष्यभरासाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते, असे त्या महिलेने कागदपत्रांद्वारे सिद्ध केले होते. नवऱ्याच्या निधनामुळे पेन्शनचा आणि या पेन्शनचा संबंध नसल्याचे लवादाने स्पष्ट केले.त्या महिलेची रक्कम थांबवणाऱ्या व्यक्तींच्या वेतनातून एक लाखांची रक्कम कापण्याबाबतचा निर्णय प्रतिवादी म्हणजेच केंद्र सरकार व लष्कर यांनी घ्यावा, असेही लवादाने म्हटले आहे.