नवी दिल्ली : १९ मार्च २०२२ पर्यंत देशात १०,६०,७०७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती देशाचे रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गडकरी यांनी म्हणाले, ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी’नुसार २१ मार्च २०२२ पर्यंत देशात १,७४२ सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यरत झाले आहेत. गडकरी म्हणाले, महामार्ग बनवला जात असतानाच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील. महामार्ग बनविणाऱ्या कंपन्यांनाच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारावे लागणार आहेत. महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या इतर सुविधांच्या स्वरूपात चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणे आवश्यक करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा प्रकारची ३९ कंत्राटे याआधीच दिली आहेत. देशातील प्रमुख महामार्गावर ५ किलोमीटरच्या अंतराने चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.लोकांमध्ये उत्सुकताउच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत लोकांत प्रचंड उत्सुकता आहे. सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना द्यायची असेल, तर सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या झपाट्याने वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने त्यात विशेष लक्ष घातले आहे.
रस्त्यावर १०.६० लाख इलेक्ट्रिक वाहने; नितीन गडकरींची संसदेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 5:59 AM