लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जुलैमध्ये भारताच्या खनिज उत्पादनात वार्षिक आधारावर १०.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाण मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (आयबीएम)कडील नव्या आकडेवारीनुसार, जुलै, २०२३ साठी खाण आणि उत्खनन क्षेत्राचा खनिज उत्पादन निर्देशांक १११.९ होता. एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीच्या तुलनेत हा निर्देशांक १०.७ टक्क्यांनी जास्त आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जुलै या कालावधीत एकूण ७.३ टक्के वाढ झाली आहे.
जुलैमध्ये खनिजांपैकी उत्पादनकोळसा ६९३ लाख टन लिग्नाइट ३२ लाख टनपेट्रोलियम (क्रूड) २५ लाख टनबॉक्साइट १४,७७,००० टन क्रोमाईट २,८०,००० टन
जुलै २०२२ च्या तुलनेत जुलै २०२३ मध्ये वाढ नोंदवलेल्या खनिजांमध्ये क्रोमाईट, मॅंगनीज धातू, कोळसा, चुनखडी, लोह धातू, सोने आणि तांबे यांचा समावेश आहे. तर लिग्नाइट, बॉक्साईट, फॉस्फोराईट आणि डायमंड यांच्यात उत्पादनात घट झाली आहे.