नवी दिल्ली - पूर्व रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमधून फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर यासह विविध ट्रेड्समध्ये ३ हजारांहून अधिक अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ साळी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ३० सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २९ ऑक्टोबर किंवा यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. केवळ ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जातील, असे नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी विभागवार असलेल्या पदांची संख्या पुढीलप्रमाणे हावडा डिव्हिजन - ६५९ पदेलिलुआ वर्कशॉप - ६१२ पदे सियालदह डिव्हिजन - ४४० पदेकांचरापाडा वर्कशॉप - १८७ पदे मालदा डिव्हिजन - १३८ पदे आसनसोल वर्कशऑप - ४१२ पदे जमालपूर वर्कशॉप ६६७ पदे एकूण रिक्त पदांची संख्या - ३११५ पदे
कोण करू शकतं अर्ज या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार हा मान्यता प्राप्त मंडळाकडून १०वी किंवा १२वीची परीक्षा ५० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्याशिवाय संबंधित ट्रेड उदाहरणार्थ वेल्डर, शीट मेटल, वर्कर, लाइनमन, वायरमन, आणि पेंटर या विषयात एनसीव्हीटी/एससीव्हीटीकडून मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआयचं सर्टिफिकेट घेतलेलं असावं.
उमेदवारांसाठी १५ ते २४ अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यावे. या भरती प्रक्रियेसाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आहे. तर एससी, एसटी, दिव्यांगांसह सर्व वर्गाच्या महिला उमेदवारांना कुठलंही नोंदणी शुल्क द्यावं लागणार नाही.