नवी दिल्ली : मागील वर्षी बीफ व्यापारी अलीमुिद्दन (५५) यांची हत्या केल्या प्रकरणातील जामिनावर असलेल्या ११ आरोपीेंचा सत्कार केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी केल्याने खळबळ माजली आहे. या आरोपींना फास्ट ट्रक न्यायालयाने जन्मठेप ठोठावली होती. मात्र रांची उच्च न्यायालयाने त्यास स्थगिती देत जामीन मंजूर केला.यातील आरोपींचा सत्कार केल्याने खळबळ माजल्यानंतर आपणास न्यायपालिकेचा आदर आहे, मला न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे, असे जयंत सिन्हा म्हणाले. सिन्हा म्हणाले की, जे निर्दोष आहेत त्यांना वाचविले जाईल आणि दोषींना शिक्षा होईल. आरोपींच्या याचिकेवर रांची रांची उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देताना सर्व आरोपींना जामिनावर सोडले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.बजरंग दलाच्या समर्थकांनी २९ जून २०१७ रोजी अलीमुद्दिन यांचे वाहन अडवून बीफ नेत असल्याच्या संशयावरून त्यांना ठार मारले. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तथापि, हायकोर्टाने त्यांना २९ जून रोजी जामीन दिला होता. कनिष्ठ न्यायालयाचा निकाल हायकोर्ट ऐकून घेणार आहे, याचा आपल्याला आनंद असल्याचे सिन्हा म्हणाले.
हत्येतील ११ आरोपींचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 2:55 AM