ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १८- १९९३ मधील सुरत येथील बाँबस्फोट प्रकरणातील ११ आरोपींना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्दोष मुक्त केले. टाडा कोर्टाने सहा वर्षांपूर्वी या आरोपींना तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली होती.
१९९३ मध्ये सुरत स्टेशन आणि वारछा रोड येथे दोन बाँबस्फोट घडवण्यात आले होते. १९९२मध्ये बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला घेण्याच्या दृष्टीने हे बाँबस्फोट घडवण्यात आले होते. या बाँबस्फोटांमध्ये एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. तर सुमारे २० जण जखमी झाले होते. या प्रकरणातील काही आरोपींना टाडा कोर्टाने २० तर अन्य आरोपींना १० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली होती. यातील ११ जणांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्दोष मुक्त केले.