बडोदा - लग्नाच्या वरातीसाठी जात असलेल्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 11 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी संध्याकाळी गुजरातमधील बडोद्याजळील रणू आणि महुवड गावांदरम्यान झाला. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बडोदा जिल्ह्यात एका व्यक्तीची वरात निघाली होते. वऱ्हाडी मंडळी टेम्पोमधून प्रवास करत होते. दरम्यान, पदरा तालुक्यातील रणू आणि महुवडदरम्यान वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अपघाताची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित बातम्या
दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू
वर्षभरात एसटीचे ८१ अपघात ; नागपूर विभागातील स्थिती
एसटी बस - जीपची समोरासमोर धडक; पाच जण ठार, सहा जण जखमीया अपघातासंदर्भात बडोद्याचे पोलीस अधीक्षक सुधीर देसाई यांना विचारले असता त्यांनी अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याचे सांगितले.