विसर्जनालाच गणेश भक्तांवर विघ्न; भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 08:22 AM2019-09-13T08:22:34+5:302019-09-13T08:36:21+5:30

बोटीत 18 जण होते.

11 dead, five rescued after boat capsizes during Ganesh immersion in Bhopal | विसर्जनालाच गणेश भक्तांवर विघ्न; भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांना जलसमाधी

विसर्जनालाच गणेश भक्तांवर विघ्न; भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांना जलसमाधी

Next

भोपाळ: मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गणपती विसर्जनदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी जात असलेली बोट नदीत उलटून ही दुर्घटना झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ता झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील खटलापुरा घाट परिसरात गणपती विसर्जन करण्यासाठी बोटीतून जात होते. यावेळी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे ही बोट उलटली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. तर काही बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथकाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. या बोटीत 18 जण होते, असे सांगण्यात येत आहेत.

"twitter-tweet">

Madhya Pradesh: 11 bodies recovered at Khatlapura Ghat in Bhopal after the boat they were in, capsized this morning. Search operation is underway. More details awaited. pic.twitter.com/mEMSJdzhE9

— ANI (@ANI) September 13, 2019

NBT

Web Title: 11 dead, five rescued after boat capsizes during Ganesh immersion in Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.