जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाले आहेत. ही बस सौजियान येथून मंडी येथे जात असताना असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक, पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एका अधिकाऱ्याने स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, सौजियानहून मंडीकडे जाणारी बस खोल दरीत कोसळली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर लगेचच पोलीस, लष्कर आणि स्थानिक लोकांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मंडीहून सौजियानकडे जात होती. बसमध्ये 24-30 प्रवासी बसले होते. बुधवारी सकाळी बरेली नाल्यात बस रस्त्यावरून घसरली आणि खोल दरीत पडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांचा आकडा वाढू शकतो कारण अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार, मृतांमध्ये 5 आणि 14 वयोगटातील दोन मुलांव्यतिरिक्त तीन महिलांचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पूंछ रोड दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. 'पूंछच्या सौजियानमध्ये रस्ते अपघातात लोकांचा मृत्यू झालेल्या दु:ख झाले आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. जखमींवर शक्य ते सर्व उपचार करण्याचे निर्देश पोलीस आणि नागरी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे असं म्हटलं आहे.