भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:51 IST2025-01-15T13:50:04+5:302025-01-15T13:51:14+5:30

कुमारस्वामी यांच्यामागे लाखो कार्यकर्ते आहेत. ते मजबुतीने पक्षाशी जोडलेले आहेत. पक्ष फोडणे अशक्य आहे असं जेडीएस प्रवक्त्यांनी दावा केला आहे.

11 JDS MLAs to may join Congress in Karnataka, DK Shivakumar to become CM, Congress MLA Claim | भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ

भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ

बंगळुरू - काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात सध्या मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवरून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यातच काँग्रेस चन्नगिरीचे आमदार शिवगंगा बसवराज यांनी केलेल्या भविष्यवाणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जेडीएसचे ११ आमदार लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होतील असं शिवगंगा बसवराज यांनी म्हटलं आहे. कर्नाटकात जेडीएस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्यारितीने विरोधी पक्ष फुटला तसाच कर्नाटकात काँग्रेस त्यांचं सरकार आणखी मजबूत करण्यासाठी विरोधी पक्ष फोडणार अशी चर्चा सुरू आहे.

आमदार शिवगंगा बसवराज म्हणाले की, जेडीएसचे एकूण ११ आमदार काँग्रेसमध्ये लवकरच सहभागी होतील. डीके शिवकुमार पक्ष संघटनेत सगळ्यांना एकत्र आणत आहेत, ते दुसऱ्याला शक्य होईल का? बाकी लोक अशाप्रकारे अन्य पक्षातून नेते आणण्यास समक्ष नाहीत. काही लोकांना केवळ सत्ता हवी. काहीजण म्हणतायेत शिवकुमार यांना असं ऑपरेशन करू द्या मग आम्ही पाहू. ते केवळ आयत्या बिळावर नागोबा आहेत परंतु शिवकुमार काम करत राहतात असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय जे लोक संघर्ष करतात त्यांना चांगले दिवस येतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्या मार्गदर्शनात पोटनिवडणुकीत ३ जागा पटकावल्या असंही बसवराज यांनी म्हटलं तर काँग्रेसचं जेडीएस फोडण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. जेडीएस पक्ष समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांना बनला आहे. कुमारस्वामी यांच्यामागे लाखो कार्यकर्ते आहेत. ते मजबुतीने पक्षाशी जोडलेले आहेत. पक्ष फोडणे अशक्य आहे असं जेडीएस प्रवक्त्यांनी दावा केला आहे.

कर्नाटकात पक्षीय संख्याबळ काय?

दरम्यान, कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ सदस्य आहेत त्यात सत्ताधारी काँग्रेसकडे १४० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात १ आमदार अपक्ष आणि १ सर्वोदय कर्नाटक पक्षाचा आहे. विरोधकांची संख्या ८४ इतकी आहे. त्यात भाजपाकडे ६६ आणि जेडीएसकडे १८ आमदार आहेत. कर्नाटकातील विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहेत. जेडीएसच्या १८ पैकी ११ आमदार जर काँग्रेससोबत गेले तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदाही लागू शकत नाही त्यामुळे येत्या काळात कर्नाटकात राजकीय भूकंप घडतो का हे पाहणे गरजेचे आहे.

Web Title: 11 JDS MLAs to may join Congress in Karnataka, DK Shivakumar to become CM, Congress MLA Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.