शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

हुंड्यात मिळाले ११ लाख रुपये, मग वरपित्याने भर लग्नात केले असे काही...

By बाळकृष्ण परब | Published: February 24, 2021 9:51 AM

11 lakh Rupees got in dowry in Marriage : देशात हुंडाबंदीचा कायदा (Dowry Prohibition Act) होऊन अनेक वर्षे झाली असली तरी आजही अनेक विवाह सोहळ्यांमध्ये हुंडा (Dowry ) दिला, घेतला जातो.

जयपूर - देशात हुंडाबंदीचा कायदा (Dowry Prohibition Act) होऊन अनेक वर्षे झाली असली तरी आजही अनेक विवाह सोहळ्यांमध्ये हुंडा (Dowry ) दिला, घेतला जातो. हुंड्यावरून अनेक विवाह सोहळ्यात वाद होतात, लग्न मोडतात. तर काही महिलांना हुंड्यापायी जीवही गमवावा लागतो. मात्र राजस्थानमधील एका माजी मुख्याध्यापकांनी आपल्या मुलाच्या विवाहात हुंडा मिळाल्यानंतर जे काही केले ते पाहून तुम्ही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. (groom father returned all the 11 lacks rupees to bride father in Rajasthan ) राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील पीपरवाला गावातील माजी मुख्याध्यापक असलेले बृजमोहन मीणा यांच्या मुलाच्या लग्नामध्ये वधुपक्षाकडून ११ लाख १०१ रुपये आणि भगवत गीता एवढा हुंडा देण्यात आला. थाळीमध्ये नोटांच्या बंडलांनी सजवलेली ही रक्कम पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटले असते. मात्र मीणा यांनी १०१ रुपये आणि भगवत गीता ठेवून घेत हुंड्यापोटी मिळालेली ११ लाख रुपयांची रक्कम वधुपित्यांकडे परत केली. मीणा यांनी केलेल्या कृतीमुळे विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्यां वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यांच्या या कृतीमुळे हुंड्याविरोधात उठणाऱ्या आवाजाला बळ मिळाले असून, समाजालाही एक चांगला संदेश मिळाला आहे. यादरम्यान, उपस्थित असलेले समाजाचे पंच, वधूचे पिता राधेश्याम, मंडवराचे माजी सरपंच दादा प्रभू लाल, सेवा निर्मितीचे प्रधानाचार्य कन्हैयालाल मीणा मानी, शिवजी राम मीणा खजुरी यांनी वरपिता बृजमोहन मीणा यांनी उचललेल्या पावलाचे कौतुक केला. तसेच समाजाने यामधून आदर्श घ्यावा, असे आवाहन केले आहे.  

दरम्यान, बृजमोहन मीणा यांनी उचललेल्या पावलाचे लोकांनीही कौतुक केले आहे. तर नववधूने सांगितले की, माझ्या सासऱ्यांनी हुंड्यात मिळालेली रक्कम परत करून समाजाला प्रेरणा दिली आहे. आता हुंड्याला विरोध करण्यासाठी अन्य लोकांनीही पुढे आलं पाहिजे, जेणेकरून गरीब कुटुंबातील मुलीला आपल्या योग्यतेनुसार वर निवडता येईल.  

टॅग्स :marriageलग्नdowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाRajasthanराजस्थान