जुनागड - गीरच्या जंगलात मागील 11 दिवसांमध्ये 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. वन अधिकाऱ्यांनी दलकहनियाजवळील परिसरात 11 सिंहांचे मृतदेह मिळाल्याची माहिती दिली आहे.
वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी 11 सिंहांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्य वन संरक्षांच्या अध्यक्षतेखाली ही नेमण्यात आलेली समिती यासंदर्भातली चौकशी करणार आहे. 11 पैकी 8 सिंहांचा मृत्यू हा आपसातील भांडणात एकमेकांवर केलेल्या हल्ल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र तर इतर तीन सिंहांचा मृत्यू कसा झाला याबाबत अहवाल आल्यावरच कळेल असेही ते म्हणाले.