नवी दिल्ली : देशात अधिकाधिक पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याच्या योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी ही माहिती दिली.डॉ. मुळे म्हणाले की, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जानेवारी २०१७ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार देशात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी २१८ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. हे लक्ष्य पूर्ण तर झालेच आहे; पण चौथ्या टप्प्यात त्यात आणखी ८७ केंद्रांची भर टाकली आहे. महाराष्ट्रात सध्या २५ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. यात ११ ची भर पडणार असून, एकूण संख्या ३६ होणार आहे.महाराष्ट्रातील ज्या शहरात नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहेत त्यात भंडारा, भिवंडी, बुलडाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, रायगड, रामटेक, रावेर या शहरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 11:14 PM