ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १० - झारखंडमधील देवघर जिल्ह्यात मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार तर ५० जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथील वैद्यनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जलाभिषेकासाठी कावडवाले रांगेत उभे असताना काही भाविकांनी रांग तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की झाली. ज्याचे रुपांतर चेंगराचेंगरीत होऊन ११ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले तर ५० जण जखमी झाले.
मंदिराचा दरवाजा उघडल्याची अफवा पसरल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिकी मिळत आहे.
दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींमा ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.