हैदराबाद- बीटेक-एमटेकच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तसा फार कठीण असतो. त्यामुळे त्यासाठी उत्तम तयारी करावी लागते. हैदराबादेतही अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनेक क्लासेसही आहेत. हैदराबादेत राहणारा 11 वर्षांचा मोहम्मद हसन अली हासुद्धा बीटेक-एमटेकच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे होते. त्याच्या या अपार ज्ञानामुळे तो चर्चेत आला आहे. सातवीत शिकणारा हा मुलगा बीटेक आणि एमटेकच्या विद्यार्थ्यांना डिझायनिंग आणि ड्राफ्टिंग शिकवतो.विशेष म्हणजे तो त्याच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही आणि 2020पर्यंत एक हजार इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्याची इच्छा आहे. हसन म्हणाला, मी गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. माझ्यासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे म्हणझे इंटरनेट शिकण्याचं एक माध्यम आहे. मी कोणतंही शुल्क आकारत नाही. कारण मी देशासाठी काही तरी करू इच्छितो. मी सकाळी शाळेत जातो आणि 3 वाजता घरी परततो. मी खेळून झाल्यानंतर स्वतःचा गृहपाठही करतो. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मुलांना शिकवण्यासाठी जातो.मी इंटरनेटवर व्हिडीओ पाहता पाहता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शिक्षण देता येईल याचा अभ्यास केला. विदेशात जाऊन भारतीय विद्यार्थी छोट्या छोट्या नोक-या करतात. त्यामुळे त्यांना मी कम्युनिकेशन स्किल धडे देतो. विद्यार्थ्यांना शिकवणं हे माझ्या आवडीचं काम आहे. हसनकडे शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थिनीनंही त्याचं कौतुक केलं आहे. मी सिव्हिल सॉफ्टवेअर शिकण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून इथे येते. तो सर्वात छोटा असला तरी चांगल्या पद्धतीनं शिकवतो.
मूर्ती लहान पण कीर्ती महान; 11 वर्षांचा अवलिया देतोय बीटेक-एमटेकच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 9:07 AM