शिलाँग (मेघालय) : अल्पवयीन सात मुलांनी ११ वर्षांच्या मुलीवर मेघालयातील मावतेन (जि. खासी हिल्स) खेड्यात दोन वेळा बलात्कार केला, असे पोलिसांनी रविवारी येथे सांगितले. मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले की मुलीवर नाताळ सणाच्या आधी भाताच्या शेतात एकदा व दुसऱ्या वेळी १३ जानेवारी रोजी तिच्या घरी बलात्कार झाला. सगळे आरोपी हे १४ ते १६ वयोगटातील असून ते मावतेन खेड्यातीलच आहेत. सगळ््या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. (वृत्तसंस्था)
११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
By admin | Published: January 23, 2017 1:04 AM