हैदराबाद : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट आली असून मागील काही दिवसात दोन्ही राज्यांमध्ये १११ लोक उष्माघाताचे बळी ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात या क्षेत्रात दोन हजारावर लोक मृत्युमुखी पडले होते.तेलंगणा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणात ६६ आणि आंध्र प्रदेशात ४५ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. उष्णतेचे सर्वाधिक २८ बळी तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये ठरले तर मेडक जिल्ह्णात ११ जणांचे निधन झाले. क्षेत्रातील नलगोंडा, हनमकोंडा, खम्मन, मेहबूबनगर आणि रामागुंडममध्ये गुरुवारी कमाल ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. आंध्र प्रदेशात उकाड्याने लोकांचे बेहाल झाले आहेत. गेल्या काही दिवसात कडप्पा जिल्ह्णात १६ आणि प्रकाशममध्ये ११ लोक उष्माघाताचे बळी ठरले. अनंतपूरमध्ये चार, विजयनगर, चित्तूर आणि करनूलमध्ये प्रत्येकी तीन, श्रीकाकुलम आणि कृष्णा जिल्ह्णात प्रत्येकी दोन तर पश्चिम गोदावरी जिल्ह्णात एक जण मृत्युमुखी पडला. सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमान अनंतपूर आणि नंदयालमध्ये नोंदविण्यात आले. (वृत्तसंस्था)
उष्माघाताचे १११ बळी
By admin | Published: April 09, 2016 1:11 AM