ऑनलाइन लोकमतआझमगढ, दि. १७- स्वातंत्र्यवीर सेनानी सुभाषचंद्र बोस हे गुमनामी बाबाच्या नावानं वावरत असल्याची अनेकदा चर्चा झाली. नेताजींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणारा त्यांचा गाडीचालक कोलोनेल निझामुद्दीन यांनी 116व्या वर्षी बँकेत खातं उघडलं आहे. त्यामुळे नेताजींचे हे 116 वर्षांचे गाडीचालक कोलोनेल निझामुद्दीन चर्चेत आले आहेत.निझामुद्दीन यांच्या मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टनुसार त्यांचा जन्म 1900 साली झाल्याचं स्पष्ट होतं आहे. बँकेत खातं खोलण्यासाठी त्यांनी दिलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध झालं आहे. फेब्रुवारीमध्ये जपानमध्ये 114 वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कोलोनेल निझामुद्दीन ही सर्वात वयस्कर व्यक्ती असल्याचं यामुळे निष्पन्न झालं आहे. कोलोनेल निझामुद्दीन यांनी वयाचे 116 वर्षं 3 महिने 14 दिवस पूर्ण केले आहेत. कोलोनेल यांची पत्नी अज्बुनिशा यांचं वयही 107वर्षं आहे. या दाम्पत्यानं हल्लीच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलं आहे. कोलोनेल निझामुद्दीन यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळेच ते 116 वर्षांपर्यंत जगू शकले आहेत.
नेताजींच्या 116 वर्षांच्या गाडीचालकानं बँकेत खोललं खातं
By admin | Published: April 17, 2016 1:33 PM