लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहा महत्वाची मंत्रालये आणि नऊ विभागांत इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) ११,७९७ जागा रिक्त आहेत, असे नरेंद्र मोदी सरकारने संसदीय समितीला सांगितले. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांतील एकूण मनुष्यबळापैकी९० टक्के मनुष्यबळ ही दहा मंत्रालये आणि विभागांतून उपलब्ध होते, हे विशेष. कार्मिक मंत्रालय, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने राज्यसभेच्या निवड समितीला लेखी उत्तरात वरील माहिती दिली. त्यानुसार इतर मागासवर्गीयांच्या ११,७९७ जागा या विभागांत भरल्या गेलेल्या नाहीत. सध्या ओबीसींसाठी २७ टक्के जागा राखीव असून त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी राज्यसभा सदस्यांच्या या निवड समितीने केली आहे. गृहमंत्रालय विभागाकडे सर्वात जास्त जागा ३,३९३ रिक्त आहेत. त्यानंतर महसूल (२,९८८), अर्थ (१,४२५), संरक्षण (१,२६८) मंत्रालय येते. रेल्वे मंत्रालयात मात्र ओबीसीची एकही जागा रिक्त नाही. या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने विशेष मोहीमही राबवली होती.
ओबीसींच्या ११,८०० जागा रिक्त
By admin | Published: July 17, 2017 3:12 AM