शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
5
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
6
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
7
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
8
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
9
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
10
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
11
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
12
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
13
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
14
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
15
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
17
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
18
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
19
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

नवी दिल्ली हादरली: कोचिंग सेंटरच्या तळघरात २ मिनिटांत १२ फूट पाणी; ३ विद्यार्थी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 5:16 AM

‘आयएएस’ होण्याचे स्वप्न भंगले, ७ तासांनी मृतदेहच सापडले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महानगरात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जुने राजेंद्रनगर येथील राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरून ३ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंग यांना अटक करण्यात आली आहे. 

सायंकाळी ७ वाजता माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफने बचाव मोहिम राबविली. मात्र, रात्री उशिरा ७ तासांनी उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या सोनी आणि केरळमधील एर्नाकुलम येथील नवीन दालवीन या ३ विद्यार्थ्यांचे मृतदेहच हाती आले. दोरखंडाच्या सहाय्याने १४ जणांची सुटका करण्यात आली.

तळघर दाखवले ‘स्टोअर रूम’

राऊ कोचिंग सेंटरचे वाचनालय बेकायदेशीर कार्यरत होते. सेंटरने इमारतीच्या आराखड्यानुसार व अग्निशमन विभागाच्या एनओसीनुसार तळघर पार्किंगसाठी आणि स्टोअर रूम म्हणून वापरण्यात येत असल्याचे दाखवले होते. पण तिथे वाचनालय सुरू करण्यात आले होते. 

दोर टाकले पण दिसलेच नाहीत...

शनिवारी रात्री इमारतीतील वीज खंडित झाल्याने तळघर वाचनालयाचे बायोमेट्रिक गेट जाम झाल्याने विद्यार्थी अंधारात अडकले. सुरुवातीला गेट बंद असल्याने तळघरात पाणी शिरले नाही, मात्र काही मिनिटांनी पाण्याचा दाब वाढून गेट तुटले. त्यानंतर तळघरात वेगाने पाणी भरू लागले.  पाण्याचा जोर इतका होता की, पायऱ्या चढणे कठीण झाले. काही सेकंदातच गुडघाभर पाणी झाल्याने विद्यार्थी बाकावर उभे राहिले. परंतु अवघ्या २-३ मिनिटांत संपूर्ण तळघर १०-१२ फूट पाण्याने भरले. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी दोर टाकण्यात आले, मात्र गढूळ पाण्यामुळे ते दिसले नाहीत. 

मृतदेह पाहू न दिल्याने कुटुंबे संतप्त

आरएमएल रुग्णालयात दुर्घटनेतील मृतदेह पाहू न दिल्याने त्यांचे कुटुंबीय आणि मित्र संतप्त झाले. मृत श्रेया यादवचे काका धर्मेंद्र यादव यांनी सांगितले की, त्यांना वृत्तवाहिन्यांद्वारे घटनेची माहिती मिळाली. मी तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. रुग्णालयात मला तिचा मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती. 

 

टॅग्स :delhiदिल्ली