नवी दिल्ली : नजिकच्या भविष्यात लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या झाल्यास त्यासाठी लागणारी जादी मतदानयंत्रे घेण्यासाठी सुमारे ४,५०० रुपयांचा खर्च करावा लागेल, असे विधी आयोगाने म्हटले आहे.एकत्र निवडणूक घेण्याच्या व्यवहार्यतेविषयी गेल्या आठवड्यात जारी केलेल्या कच्च्या आहवालात निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी उद््धृत करून विधी आयोग म्हणतो की, सर्व निवडणुका एकदम घ्यायच्या झाल्यास १२.९ लाख बॅलट युनिटचा, ९.४ लाख कंट्रोल युनिट््सचा व १२.३ लाख व्हीव्हीपॅटचा तुटवडा भासेल. ती खरेदी करण्यासाठी सुमारे ४,५०० कोटी रुपयांचा खर्च येईल. सन २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देशभरात १०.६० लाख मतदान केंद्रे उभारावी लागतील, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिल्याचे विधी आयोगाने नमूद केले. प्रत्येक मतदान यंत्राचे बॅलट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट असे तीन भाग असतात. या तिन्हीची सध्याची किंमत प्रति युनिट ३३,२०० रुपये आहे. अशा प्रकारे वरीलप्रमाणे जादा युनिट खरेदी करण्यासाठी ४,५५५ कोेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.वाढीव खर्चाचा बोजा पडणार नाहीप्रत्येक मतदान केंद्रावर जादा मतदान यंत्रे, अधिक निवडणूक कर्मचारी व थोड-फार जास्त निवडणूक साहित्य यासाठी येणारा जास्तीचा खर्च सोडल्यास, एकत्रित निवडणुका घेण्यासाठी आणखी वाढीव खर्चाचा बोजा पडणार नाही, असेही या अहवालात नमूद केले गेले.
एकत्रित निवडणुकीसाठी लागतील नवी १२ लाख मतदान यंत्रे; ४,५00 कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 2:31 AM