सलग दुसर्या दिवशी १२ लाखाची डाळ जप्त
By admin | Published: October 30, 2015 11:55 PM
जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी एमआयडीसी हद्दीतील वसंत एन्टरप्रायजेस (सेक्टर एन. ७१) याठिकाणाहून १२ लाख ७९ हजार ६२० रुपयांची डाळ जप्त केली आहे. सलग दुसर्या दिवशी ही कारवाई झाल्यामुळे अवैधरित्या डाळीचा साठ करणार्या व्यापार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी एमआयडीसी हद्दीतील वसंत एन्टरप्रायजेस (सेक्टर एन. ७१) याठिकाणाहून १२ लाख ७९ हजार ६२० रुपयांची डाळ जप्त केली आहे. सलग दुसर्या दिवशी ही कारवाई झाल्यामुळे अवैधरित्या डाळीचा साठ करणार्या व्यापार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. राज्यासह संपूर्ण देशात डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात ग्राहकांची फसवणूक करून त्यांना निकृष्ट डाळ विकण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात वाढले आहे. व्यापार्यांचे हे गैरप्रकार रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी शहरात धडक मोहीम सुरू केली आहे. सापळा रचून केली कारवाई एमआयडीसीतील सेक्टर क्रमांक ७१ येथील वसंत एन्टरप्रायझेस हे गोडावून राजकुमार वसंतलाल मंडोरे यांच्या नावावर आहेत. त्यांच्या गोडावूनवर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आर. आर. चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांच्यासह त्यांच्या पथकातील पथकातील अधिकार्यांनी धाड टाकली. तेव्हा परपराज्यातून आयात केलेल्या धान्याचे के भरण्याचे काम सुरू होते. याप्रसंगी अधिकार्यांनी के तपासले असता, त्यांच्यावर डाळीचे नाव, उत्पादन केल्याची तारीख व पत्ता यापैकी काहीही दिसून आले नाही. त्यामुळे या गोडावूनमधील कोहीनूर व नटराज कंपनीची लाखोरी या प्रकराची डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातील काही डाळीचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. २८ हजार ४३६ किलोग्रॅम डाळ कोहीनूर व नटराज कंपनीची लाखोरी प्रकराच्या डाळीचे ९४८ के अधिकार्यांनी जप्त केले आहे. या कयाचे वजन २८ हजार ४३६ किलोग्रॅम आहे. मिठाई व तेलाचेही घेतले नमुने गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून अन्न व औषध प्रशासनातर्फे शहरातील ११ मिठाई तर १२ दुकानांवरून तेलाचे नमुने घेण्यात आले आहे. ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच, संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त वैद्य यांनी दिली आहे. दुकानदारांना दिली तंबी अन्न व औषध प्रशासनातर्फे शहरातील प्रमुख २० ते २२ मिठाई विक्री दुकानदारांची बैठक घेण्यात आली. मिठाईत भेसळ होणार नाही, यासाठी विक्रेत्यांना तंबी देण्यात आली. तरीही काही विक्रेते मिठाईंमध्ये भेसळ करत असल्याची कुजबूज आहे. त्यापार्श्वभूमीवर आता अन्न व औषध प्रशासनातर्फे लवकरच मिठाईच्या विक्रेत्यांकडे मोर्चा वळविण्यात येईल.