शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 4:26 AM

ऑक्सिजनअभावी कधीपर्यंत असे मृत्यू होत राहणार आहेत? राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचीही हीच स्थिती आहे. 

शहडोल : मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मिलिंद शिरालकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ऑक्सिजनची कमतरता आहे. मात्र, शहडोलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मृत्यूंमागे ऑक्सिजनची कमतरता असल्याचे वृत्त फेटाळले आहे. मृतांच्या नातेवाईकांनीही असा आरोप केला आहे की, सिलिंडरच्या कमतरतेमुळेच हे मृत्यू झाले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत, शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भोपाळ, इंदौर, येथे ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. 

उपचाराअभावी डॉक्टरचा मृत्यूएस.पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये कोरोनामुळे शनिवारी ५१ जणांचा मृत्यू झाला. त्यात ११ जण पाटण्यातील, तर इतर जिल्ह्यांतील ४० जण होते. पीएमसीएचचे डॉक्टर डॉ. ललन प्रसाद यांचा मृत्यू त्यांना वेळेवर रुग्णालयात खाट व प्राणवायू न मिळाल्यामुळे झाला.प्रसाद यांचे कुटुंबीय त्यांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी इकडून तिकडे फिरत राहिले; पण व्यर्थ. रात्री प्रसाद यांचा मृत्यू झाला. आयएमएचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय कुमार यांनी सांगितले की, आमच्याशी संपर्क साधल्यावर आम्ही प्रयत्न केले; परंतु यश मिळाले नाही. उपचारांविनाच एक डॉक्टर मरण पावला. नालंदा जिल्ह्यातील नूरसराय विभागाचे गटविकास अधिकारी राहुल कुमार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल कुमार यांचा पाटण्यातील फोर्ड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी ते अँटिजन तपासणीत सकारात्मक निघाले होते. शेखपुरा जिल्ह्यात पंकज चौरसिया (२८)  यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने मृतदेह हॉटेलजवळ सोडून पळून गेले. हा प्रकार पोलिसांना समजल्यावर त्यांनी कुटुंबीयांची समजून काढल्यावर अंत्यसंस्कार केले गेले. कोरोनाची बाधा या जिल्ह्यात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झाली आहे. याशिवाय अर्धा डझन बँक कर्मचारी मरण पावले आहेत.

 बँकव्यवस्थेवर परिणाम झाला असून, बँकांच्या अनेक शाखा बंद कराव्या लागल्या आहेत.एनएमसीएचमध्ये प्राणवायूच्या टंचाईमुळे कोविड कक्षातील रुग्णांत घबराट निर्माण झाली आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनोद कुमार सिंह यांनी विभागीय प्रधान सचिवांना पत्र पाठवून अधीक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने नाराज सिंह यांचे म्हणणे असे की, या रुग्णालयाचा प्राणवायूचा साठा दुसऱ्या ठिकाणी पा‌ठवला जात आहे. यामुळे रुग्णालयात अप्रिय घटना होऊ शकते व सगळा दोष मला दिला जाईल. कोरोना संक्रमितांची संख्या सतत वाढत असल्यामुळे येथे ४०० ते ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज आहे. प्रत्यक्षात १०० सिलिंडर्सच उपलब्ध होत आहेत, असे सिंह म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या