शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

बस अपघातात १२ विद्यार्थी ठार

By admin | Published: January 20, 2017 5:51 AM

शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार

एटा (उत्तर प्रदेश) : शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार तर ३५ मुले जखमी झाली. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात गुरुवारी हा भयंकर अपघात घडला. दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी शंभू नाथ यांनी यापूर्वी १५ मुले ठार झाल्याचे म्हटले होते. तथापि, नंतर अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या १३ असल्याचे स्पष्ट केले. अलिगंज-पलियाली रस्त्यावरील असदनगर गावाजवळ ही दुर्घटना घडली. या बसमध्ये जे.एस. विद्यानिकेतनचे विद्यार्थी होते. २० जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी एटा, सैफेई आणि अलीगड येथे तर काहींना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मृतांत ५ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाहनाला मोठा अपघात होण्याची राज्यातील ही अलीकडची दुसरी घटना आहे. यापूर्वी भदोही जिल्ह्यात रेल्वेने स्कूल व्हॅनला उडविल्यामुळे ८ विद्यार्थी ठार तर १४ जण जखमी झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची देखरेख केली, असे नाथ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मुलांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमींना योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. ।बस उलटून २५ जखमीजयपूर : राजस्थानात शालेय बस उलटून २५ विद्यार्थी जखमी झाले. चुरू जिल्ह्यात गुरुवारी ही दुर्घटना घडली. ही बस छोटेगाव येथून राडेलसर येथे जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती उलटली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात, तर गंभीर जखमींना चुरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. जखमींत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.।शाळेची मान्यता रद्दतीव्र थंडीमुळे आठवीपर्यंतच्या शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. तथापि, जे.एस. विद्यानिकेतनचा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकाने या आदेशाची पायमल्ली करून शाळा सुरू ठेवली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले असून शाळा व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.