शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

६ ऐवजी मिळणार १२ हजार! पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करण्याची शक्यता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 7:46 AM

PM Kisan fund: २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना सर्वांत मोठा गेम चेंजर मानत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ सुमारे १२ योजना आणण्याची तयारी सुरू आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली  - २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना सर्वांत मोठा गेम चेंजर मानत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ सुमारे १२ योजना आणण्याची तयारी सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून वाढवून दुप्पट म्हणजेच १२ हजार रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यताही आहे.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी केंद्र सरकारने आपला पेटारा खुला करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांसाठी ३७०००० कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत खरीप व रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवण्याचीही योजना तयार आहे.

५०,००० प्रत्येक शेतकऱ्याला  मिळत असल्याचे केंद्रीय खत व रसायनमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. १२ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आहे. ६३०००० कोटी रुपये  किसान सन्मान निधी, खत सबसिडी, एमएसपीमध्ये वाढ, सिंचन प्रकल्पासाठीचा निधी व अन्य मदत याद्वारे देण्यात येत आहे. देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम दिल्यास प्रत्येक  शेतकऱ्याला ५२ हजार रुपयांपेक्षा जास्त होतात.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला १८ हजार?दिवाळीत किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम दुप्पट म्हणजेच १२ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारनेही वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित १८ हजार रुपये येतील. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना आणणार असून, यात त्यांना सबसिडी देण्याची व्यवस्था असेल.

श्रीश्री रविशंकर व सद्गुरू सांगताहेत शेतीच्या पद्धतीकेंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशात शेती सुधारण्यासाठी जमिनीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व पृथ्वीला वाचविण्यासाठी केंद्र सरकार आध्यात्मिक गुरूंची मदत घेत आहे. संत श्रीश्री रविशंकर व संत सद्गुरूंचा सल्ला व मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने रासायनिक उर्वरकांचा शेतीतील वापर बंद करण्याची व जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याची योजना तयार केली आहे.युरिया सबसिडी योजना मार्च २०२५पर्यंत सुरू राहणारसध्याची युरिया सबसिडी योजना मार्च २०२५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या योजनेत युरिया सबसिडीवर ३.७० लाख कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. 

सरकार शेतकऱ्यांना खूश का करतेय?विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनापासून केंद्र सरकारच्या प्रतिमेवर देशातच नव्हे तर जगभरात परिणाम झाला आहे. तथापि, शेतकरी आंदोलनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपवर याचा जास्त परिणाम झालेला दिसून आला नाही. तरीही केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची नाराजी दूर करू इच्छित आहे. त्यासाठीच शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी अनेक योजना निवडणुकीच्या वर्षात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र