शिमला:हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीतीमधील खंमीगर ग्लेशियरवर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 16 ट्रेकर्सच्या टीमचे 12 सदस्य अडकल्याची माहिती समोर आली असून, यातील दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. सध्या अडकलेल्या इतर ट्रेकर्सना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष ऑपरेशन सुरू केले आहे. यासाठी 32 सदस्यीय बचाव पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
धूळ काय आहे, पृथ्वीवर इतकी धूळ येते कुठून? वाचा संशोधक काय सांगतात...
बचाव पथकात आयटीबीपी कर्मचारी आणि वैद्यकीय टीम
सोमवारी पायी चालत पोहोचलेलेल्या दोन ट्रॅकर्सकडून स्थानिक प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, 16 ट्रेकर्सची टीम खंमीगार ग्लेशियरवर ट्रेकिंगसाठी गेली होती. यातील 12 जण अद्याप वरच अडकले आहेत. लाहौल-स्पीतीचे डीसी नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''दोन ट्रेकर्सचा वाटेतच मृत्यू झाला आहे. इतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी, 32 सदस्यीय बचाव पथक तयार केले आहे. लवकरच इतर ट्रेकर्सना वाचवले जाईल.''
'भारत बंद'दरम्यान धक्कादायक घटना, पोलिस अधिकाऱ्याच्या पायावर चढवली कार
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकले नाही
डीसी नीरज कुमार यांनी पुढे सांगितले की, ''हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका करण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकले नाहीत. अडकलेल्या ट्रेकर्सपैकी सात ट्रेकर्स पश्चिम बंगालच्या हृदयपूर येथील अरेते माउंटेनियरिंग फाउंडेशनचे (क्लब) आहेत. हा क्लब भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनमध्ये नोंदणीकृत आहेत.''
पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय जाता येणार 'सिंगापूर'ला, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण ?
6 दिवसांत पूर्ण होईल रेस्क्यू ऑपरेशनखंमीगर ग्लेशियरमध्ये अडकलेल्या 12 ट्रेकर्सना वाचवण्यासाठी पिन व्हॅलीच्या काह गावापासून बचाव कार्य सुरू होईल. बचाव पथक 28 सप्टेंबरला पहिल्या दिवशी काह येथून चांगथांगो, दुसऱ्या दिवशी चांगथांगो ते धार थांगो आणि शेवटच्या दिवशी धारथांगो येथून खामीगर ग्लेशियरला पोहोचेल. ट्रेकर्सची सुटका केल्यानंतर बचाव दल पुढील तीन दिवसांत खामीगरहून काहला पोहोचेल.