शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

व्याजाच्या आमिष दाखवून १२ महिलांना २९ लाखाचा गंडा

By admin | Published: June 26, 2016 8:43 PM

जळगाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील गोपाळपुरा, पोलीस लाईन व चंदू अण्णा नगरातील १२ महिलांची तब्बल २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात फसवणूक झाली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी तालुका पोलीस स्टेशन गाठून दोषी महिलांच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनला गोंधळ घातला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन महिलांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

जळगाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील गोपाळपुरा, पोलीस लाईन व चंदू अण्णा नगरातील १२ महिलांची तब्बल २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात फसवणूक झाली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी तालुका पोलीस स्टेशन गाठून दोषी महिलांच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनला गोंधळ घातला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन महिलांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलीस व फसवणूक झालेल्या महिलांनी दिलेली माहिती अशी की, नंदा जाधव ही गोपाळपुर्‍यात रघुनंदन महिला बचत गट व भीसी चालविते.तर सविता साळुंखे ही तिला मदत करते. प्रत्येकी पाच हजार रुपये महिना या प्रमाणे २० महिलांची भीसी आहे. नंदा जाधव ही भीसीचा व्यवहार पाहत असल्याने पहिली भीसी (एक लाख रुपये) तिला १० जून रोजी देण्यात आली. यापुर्वीचे भीसीचे व्यवहार सुरुळीत झाल्याने नंदा जाधव हिच्यावर विश्वास बसला होता.
मुलीला हिरोईन बनविण्यासाठी घेतले पैसे
नंदा जाधव व विजया रत्नाकर शिंपी (वय ३९ रा.गोपाळपुरा, जळगाव) यांची ओळख असल्याने जाधव ही सहा महिन्यापूर्वी विजया शिंपी यांच्याकडे आली होती. मुलगी पल्लवी हिला हिरोईन बनवायचे आहे. त्यासाठी मला पैशाची गरज आहे. बॅँक नियमानुसार मी तुम्हाला व्याज देईन असे आमिष दाखवून पैशाची मागणी केली. सविता साळुंखे हि देखील तिच्या सोबत होती. तुझे पैसे कुठे जाणार नाहीत, हवे तर माझ्या मध्यस्थीने पैसे दे असे म्हणत दोघींनी पैशासाठी तगादा लावला.
दागिने गहाण ठेवले
सततच्या तगाद्यामुळे शिंपी यांनी एक लाख ७० हजार रुपये रोख व अंगावरील दागिने गहाण ठेवले. २६ एप्रिल २०१६ रोजी ६३ हजार, ३० मे २०१६ रोजी १५ हजार ५०० व ७९ हजार ५०० असे एकुण २ लाख ४९ हजार ५०० रुपये सविता साळुंखे हिच्या मार्फत नंदा जाधव हिला मुलांसमक्ष दिले. ठरलेल्या वेळेत पैसे दिले नाहीत म्हणून शिंपी यांनी जाधव साळुंखे हिच्याकडे तगादा लावला. यावेळी दोघीही एकमेकावर आरोप करु लागल्या व नंतर मी नंतर तुला पैसे देईन असे जाधव हिने सांगितले.