शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धक्कादायक! स्मोक पान खाल्ल्याने मुलीच्या पोटात पडलं छिद्र; शस्रक्रियेदरम्यान कापावा लागला भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:29 IST

बंगळुरुमध्ये स्मोक पान खाल्ल्यामुळे एका लहान मुलीच्या पोटात छिद्र पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Smoke Paan Side-Effect: सध्याच्या लग्नसोहळ्यांमध्ये ट्रेडिंग गोष्टींचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मग लग्नातल्या जेवणातही याचा अधिक वापर होत आहे. लग्नातल्या जेवणावरुन अनेकदा चर्चा केली जात असते. त्यामुळे ते अधिक आकर्षक करण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. मात्र याच नादात एका लहानग्या मुलीचा जीव जाता जाता वाचला आहे. एका लग्नात स्मोक पान खाल्ल्याने १२ वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र पडण्याची गंभीर घटना घडली आहे.

बंगळुरुतील एका लग्नात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मुलीचा त्रास वाढल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला. बंगळुरुच्या एचएसआर लेआउट येथे लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पीडित मुलीने स्मोक पान खाल्लं होतं. या प्रकारच्या पानामध्ये द्रव स्वरुपातल्या नायट्रोजनचा वापर केला जातो. पान खाल्ल्यानंतर अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. काही वेळातच मुलगी वेदनेने ओरडू लागली. मुलीची अवस्था पाहून कुटुंबियांनी तात्काळ तिला नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दाखल केलं. इंट्राऑपरेटिव्हद्वारे डॉक्टरांना  मुलीच्या पोटात द्रव नायट्रोजन जास्त प्रमाणात असल्याने छिद्र झाल्याचे कळलं.

मुलीची प्रकृती बिघडत चालल्याने नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुलीवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून सध्या ती सुखरुप आहे. डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान द्रव नायट्रोजनमुळे मुलीच्या  पोटात ४.५ सेमीचे मोठे छिद्र तयार झाल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टरांना पोटाचा काही भाग कापावा लागला. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण बंगळुरु शहरात सुरु आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रव स्वरुपातील नायट्रोजन पोटात गेल्यामुळे शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. नायट्रोजन पोटात गेल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतात. दुसरीकडे या प्रकारच्या नायट्रोजनचा वापर लग्नाच्या पार्टीत दिल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जात आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकSocial Viralसोशल व्हायरलHealthआरोग्य