नवी दिल्ली : नारळ फोडणे तर दूरच अनेकांना हाताने कांदा फोडायचे जिवावर येते; मात्र केरळच्या एका पठ्ठ्याने कोणत्याही अवजारांशिवाय एका मिनिटात १२४ नारळ फोडून जागतिक विक्रम केला आहे. के. पी. डॉमनिक यांनी हा दमदार विक्रम केला. पुंजार येथील रहिवासी असलेले डोमनिक यांनी त्रिशूरच्या शोभा सिटी मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात एका मिनिटात १२४ नारळ फोडले. हातात काहीही परिधान न करता डोमनिक यांनी १२४ नारळांचे तुकडे केले. त्यांनी जर्मनीच्या मुहमद काहरिमनोविक यांचा विक्रम मोडला. काहरिमनोविक यांनी एका मिनिटात ११८ नारळ फोडले होते. डोमनिक यांनी ११८ नारळांचा विक्रम मोडून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले. डोमनिक यांच्या या विक्रमाचा व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यात ते रांगेत ठेवलेले नारळ एकापाठोपाठ फोडताना दिसतात.
एका मिनिटात फोडले १२४ नारळ
By admin | Published: March 01, 2017 4:36 AM