- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते. वर्ष २००९-२०१४ दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकीर्दीत रेल्वेमार्ग कार्यान्वित होण्याची ही कामगिरी १२४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.२०१४-२०२१ या कालावधीत ३१० ते ६२२ टक्के अशी थेट वृद्धी आहे. हा आश्चर्यजनक तपशील रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांच्यासह इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली.
आकडे काय सांगतात?- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी वर्ष २०२१-२०२२मध्ये सर्वाधिक ८,५४७ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले. ही तरतूद सरासरी वार्षिक खर्चाच्या तरतुदीच्या ६३० टक्क्यांपेक्षा जास्त होती.- वर्ष २००९-२०१४ दरम्यान हीच रक्कम दरवर्षी १,१७१ कोटी रूपये होती. वर्ष २०१९-२०२० दरम्यान ७,२८१ कोटी रूपये दिले गेले. ही रक्कम २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी तरतुदीच्या ५२२ टक्क्यांपेक्षाही जास्त होती.- वर्ष २०२१-२०२२ कालावधीत ६,७०० कोटी रूपये खर्च केले गेले. ही तरतूद २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी रकमेच्या तुलनेत ४७२ टक्के जास्त होती.