शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

१२६ तरुण अतिरेकी मार्गाला - मेहबुबा मुफ्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 3:21 AM

जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोर्‍यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २0१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.  ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. 

ठळक मुद्देबुर्‍हाण वाणीच्या हत्येनंतर दहशतवादाकडे कल

जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोर्‍यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २0१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.  ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. संसदेला सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे स्थानिक तरुणांचे प्रमाण २0१४ नंतर कमालीचे वाढले आहे. सन २0११ ते २0१३ या काळात भरतीचे प्रमाण कमी होताना दिसले होते. सन २0११ मध्ये २३ तरुण दहतवादी संघटनांत सहभागी झाले, तर हाच आकडा २0१२ मध्ये २१ आणि २0१३ मध्ये १६ इतका होता. मात्र, २0१४ मध्ये हा आकडा ५३ वर पोहोचला. पुढच्या तीन वर्षात हे आकडे अनुक्रमे ६६, ८८ व १२६ असे वाढत गेले. हिजबुल मुजाहिद्दिनचा म्होरक्या बुर्‍हान वणी लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर तरुणांचे हत्यार हातात घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नव्वदच्या दशकात दहशतवादाकडे ओढले जाणारे तरुण वआताचे यात आमुलाग्र फरक आहे, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सध्या दहशतवादी संघटनांत भरती होणारे तरुण आधीच्या तुलनेत कमालीचे कट्टर आहेत. त्यांना कारवायांमध्ये मारले जाण्याची अजिबात फिकीर नसते. तुरुंगात २,६९४ कैदीमुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी असेही सांगितले की, राज्यात विविध तुरुंगांमध्ये २ हजार ६९४ लोक कैदेत आहेत. यात ९६ महिला आहेत. यातील आठ महिलांसह २८८ जणांवर दोष सिद्ध झाला आहे. अन्य २ हजार १५६ जणांवर खटले सुरु आहेत. 

दगडफेकीत ११,५६६ जवान जखमी तीन वर्षांत काश्मीरमध्ये दगडफेकीत ११ हजार ५६६ सुरक्षा जवान जखमी झाले असून, ११0 स्थानिक रहिवासी व दोन पोलिसांना जीव गमावले आहेत, अशीही माहिती मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. या तीन वर्षांमध्ये दगडफेकीच्या ४७३६ घटना घडल्या. त्यात ९ हजार ६७0 पोलीस कर्मचारी आणि १ हजार ८९६ सुरक्षा जवान जखमी झाले. 

५१५ घुसखोरांना अटकनवी दिल्ली : लोकसभेत गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले की, २0१७ मध्ये जम्मू-काश्मिरात ५१५ घुसखोरांना अटक करण्यात आली आणि ७५ अतिरेकी कारवाईत ठार झाले. सन २0१६ मध्ये सीमेवर घुसखोरी करणार्‍या ४५ अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात आले.  सीमेवरुन होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने कडकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे, घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीTerrorismदहशतवाद