गुनाः मध्य प्रदेशमधल्या गुना इथल्या विशेष न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अनुसूचित जातीतील एकाला मारहाण करून त्याची अमानुष हत्या करणाऱ्या 13 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या 13 आरोपींपैकी 12 जण हे उच्च जातीचे आहेत. हा प्रकार 2017मध्ये घडला आहे. हा प्रकार घडण्यासाठी सरपंच प्रणीव ऊर्फ पप्पू शर्मा यांच्या नेतृत्त्वात उच्च जातीच्या लोकांनी अहिरवार याच्याविरोधात दोन तक्रारी नोंदवल्या आहेत.पहिल्या तक्रारी अहिररावनं गुनापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातून ट्रॅक्टर जोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर दुसऱ्या तक्रारीत अहिरवार यानं हमुखान ग्रामपंचायत भवनातून 15 किलो धान्य चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परंतु न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत अहिरवार या व्यक्तीवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं होतं. अहिरवार यांच्या कुटुंबीयांनीही या आरोपांचं खंडन केलं होतं. अहिरवार बंधूंकडे भरपूर जमीन असून, घरात अन्न-धान्याची कमी नसल्याचंही सांगितलं होतं. अहिरराव याच्यावर दोनदा हल्ला झाला होता.त्यानंतर त्यानं एससी-एसटी अॅक्टअंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंदवला. एक जून रोजी सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश प्रदीप मित्तल यांनी 13 आरोपींना दोषी ठरवलं असून, आयपीसी कलम 302(हत्या), 459 (घरात घुसून तोडफो करणे) याअंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 13 आरोपींमधल्या सहा आरोपींचं वय 25 वर्षांहून कमी आहे. या प्रकरणात 16 महिने सुनावणी सुरू होती. न्यायालयानं सबळ पुराव्यांनंतर आरोपींना शिक्षा सुनावली आहे.
दलिताची मारहाण करून अमानुष हत्या करणाऱ्या 13 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 10:15 AM